एक सुई आरोग्य देई

मानवी जीवन व आजार हे जन्मापासून मृत्यूपर्यंत एकत्रित राहणारे घटक आहेत. ‘शरीरं माध्यम खलु धर्म साधनम्‌’ शरीर हे आपल्या करायच्या सगळ्या कार्याचे व कृत्याचे माध्यम असल्यामुळे शरीर आणि मन सुदृढ राहिले पाहिजेत यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहायला हवे. ‘सर्वे संन्तु निरामय:’ ही प्रार्थना म्हणताना साऱ्याच जणांना निरामय आयुष्य लाभावे ही इच्छा आपण ईश्वराजवळ व्यक्त करतो.

आहार, विहार, निद्रा या तिन्ही अंगांचा अत्यंत सूक्ष्म असा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी दिनचर्या ठरविली होती. आजच्या या धकाधकीच्या जीवनात, स्पर्धेच्या जगात आहार, विहार, निद्रा याच्या मर्यादा पाळणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले आहे. त्यातच आधुनिक औषध प्रणालीतील औषधांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम यामुळे आजार परवडला पण उपचार नकोत ही समाजाची बनत चालेली मनोवृत्ती या पार्श्वभूमीवर देशोदेशीच्या पारंपरिक वैद्यकीय पध्दतींकडे आज लोकांचा कल वाढत आहे. निसर्गोपचार, अ‍ॅक्युपंक्चर, योग, आयुर्वेद, होमिओपॅथी ही काही उदाहरणे आहेत.

‘’अ‍ॅक्युपंक्चर’ या शास्त्राला खूप इतिहास आहे. ज्या ज्या वेळी मनुष्य समूह एका जागी स्थिर राहू शकला, नैसर्गिक आपत्ती, लढाया, साथीचे रोग यापासून दूर राहू शकला त्या त्या वेळी मनुष्य समूहाने कला, क्रीडा, संस्कृती याच बरोबर वैद्यकीय पध्दतीत लक्षणीय प्रगती केल्याचे दिसून येते. चीन, जपान, कोरिया या देशांमध्ये अ‍ॅक्युपंक्चर जवळ जवळ ८०० वर्षे प्रचलित आहे आणि यामुळेच या शास्त्राचा उगम या देशांमध्ये झाला असावा असा दावा ऐतिहासिक संशोधक करतात. प्रत्यक्षात मात्र या शास्त्राचा उगम भारतातच झाला ही गोष्ट सहजासहजी स्वीकारली गेली नसली तरी वस्तुस्थिती आहे. त्याला सांप्रदायिक आधार आहे. शिवसंप्रदायात उदयाला आलेल्या नाथसंप्रदायाकडून सुफी संप्रदायांनी ही विद्या अवगत केली आणि त्यांच्याद्वारे या विद्येचा जगभर प्रचार व प्रसार झाला. उदाहरणासाठी दोन अ‍ॅक्युपंक्चरचे उपयोग आजही आपल्या इथे टिकून राहिले आहेत आणि गेले काही हजार वर्षे त्याचा उपयोग सांगत आहेत. जसे जन्मत: कान टोचण्याची प्रथा रोग प्रतिकारशक्ती संतुलित ठेवण्यासाठी केली जायची. तसेच स्त्रियांमध्ये नाक टोचण्याची प्रथा ज्याचा उपयोग स्त्रियांच्या आजाराविरुध्द काम करण्यासाठी होत होता.

अ‍ॅक्युपंक्चरचे मुख्य सूत्र

मानवाचा देह सचेतन आहे. या सचेतनात लपलेला चेतना हा शब्दच चैतन्य या संकल्पनेशी नातं सांगून जातो. अणू, परमाणू, खनिज, संयुग यांच्या साहाय्याने विविध आकारात, मिश्रणात, गुणधर्मात, व्यक्त होत असणाऱ्या विविध संयुगांना भौतिक, रासायनिक गुणधर्म असतात. हे गुणधर्म म्हणजे चैतन्य नव्हे. या गुणधर्मांनी युक्त असलेला विशिष्ट आकृतीबंध तयार झाल्यावर चराचराला व्यापून उरणारा ब्रह्मचैतन्याचा अंश ज्यावेळी मानवी संरचनेत प्रवेश करतो तेव्हा सजगता येते, चैतन्य येते, सजीवता येते. या ब्रह्मस्रोताकडून येणाऱ्या शक्ती पुंजाला आत्मा, ब्रह्म, चैतन्य, जीव, प्राण, शक्ती या विविध नावाने ओळखले जाते. या शरीराला सजग करणाऱ्या ब्रह्मशक्तीचं हे छोटं स्वरूप विज्ञानाच्या जगात ‘Vital Energy’ या नावाने ओळखले जाते.

आधुनिक विज्ञानाने याचे स्वरूप जाणून घेताना स्वत:च्या मर्यादा मान्य केलेल्या आहेत. म्हणूनच ‘Energy is nither created nor destroyed. There is only transformation of form of energy.’ हे सूत्र मान्य केले आहे. शरीराला वाढ, स्फूर्ती, ऊर्मी, आरोग्य आणि क्रयशक्ती देणाऱ्या ऊर्जास्त्रोताला शास्त्रीय भाषेत ‘प्राणशक्ती’ असे म्हणतात. हीच प्राणशक्ती विविध कारणांनी शरीराच्या विशिष्ट भागास कमी मिळाल्याने अथवा अजिबात न मिळाल्याने शरीराच्या अवयवांमध्ये आजाराची निर्मिती होते. हा अ‍ॅक्युपंक्चरचा आजाराबद्दल सिध्दांत आहे.

विषाणू, जिवाणू, प्रतिकारशक्तीचा ऱ्हास ही ऍलोपॅथिक मेडिसीनने सांगितलेली आजाराची कारणे आहेत. या सिध्दांतानुसार अ‍ॅक्युपंक्चरच्या संदर्भात ऊर्जाशक्तीच्या अभावाने सुरू झालेल्या शरीराच्या ऱ्हासाचे हे परिणाम आहेत. कारणपरंपरा नव्हे. ही ऊर्जाशक्ती शरीराच्या सर्व भागामध्ये पसरण्यासाठी ज्या मार्गांचा वापर करते त्या मार्गांना ‘मेरिडीअन्स’ असे अ‍ॅक्युपंक्चरच्या भाषेत म्हटले जाते. एकाही मेरीडिअनमध्ये असंतुलन झाल्यास त्या अवयवाचे कार्य बिघडते. अ‍ॅक्युपंक्चरद्वारे नेमक्या असंतुलित मेरीडिअनमध्ये सुईने प्रक्षेप करून तरंग निर्माण करून प्राणशक्ती खेळती करावी लागते किंवा संतुलन साधावे लागते.

शरीराचे विच्छेदन केल्यानंतर शरीरात रक्तवाहिन्या, मज्जातंतू, अस्थी ह्या जशा दृष्टीस पडतात त्याप्रमाणे मेरीडिअन्स सापडत नाहीत म्हणून त्याचे अस्तित्व नाकारणारी काही मंडळी आहेत. पण जिथे धूर असतो तिथे अग्नी असतोच. ‘यत्र धूम: तत्र: अग्नि’ (चरक संहिता)

या सिध्दांताप्रमाणे ह्या मेरिडीअन्सवर अनेक परिणामकारक बिंदू असतात. ह्या बिंदूवर दाब दिला असता अथवा ह्या बिंदूना सुईने उत्तेजित केले असता आपणाला जे निकाल आजारांच्या संदर्भात मिळतात ते आश्चर्यकारक आहेत. संपूर्ण शरीरभर पसरलेल्या ह्या मेरिडीअन्सच्या जाळ्यामुळे ही प्राणशक्ती प्रत्येक पेशीपर्यंत पोचत असते. प्रत्येक पेशीला चेतना देत असते. सुकलेल्या शेताच्या निगराणीसाठी जसे पाट्यातून पाणी सोडण्यात येते आणि त्यातील पिकांना संजीवनी मिळते. त्याच प्रकारे प्राणशक्तीच्या शरीराच्या भागामध्ये वाहत येणाऱ्या पाटामध्ये होणारा अडथळा अ‍ॅक्युपंक्चरद्वारा दूर केल्याने प्राणशक्तीचा अखंड प्रवाह पेशींपर्यंत पोहोचून या भागाला संजीवनी मिळते. प्रत्येक पेशीला मिळालेली ही संजीवनी म्हणजे आरोग्याची फुलबाग फुलण्याचा संकेतच होय.

अ‍ॅक्युपंक्चरच्या उपचार पध्दतीत शरीराच्या या सर्व मेरिडीअन्सचा अभ्यास, त्यावरील सर्व बिंदूंचा अभ्यास, उपचारासाठी यामधील एक किंवा एकापेक्षा अधिक बिंदूंचा केला जाणारा वापर, मेरिडीअन्सवरच्या बिंदूवर सुई अलगद टोचणे (अ‍ॅक्युपंक्चर) असा असतो.

यातील ऊर्जाशक्तीबद्दल सांगताना जिला आपण ‘प्राणशक्ती’ असे म्हटले आहे ती सर्व सृष्टीला व्यापून उरलेल्या प्राणशक्तीचाच एक भाग आहे. मडक्याच्या आतमध्येही आकाश असते आणि बाहेरही. आत असते ते घटाकाश आणि बाहेर असते ते आकाश. घट फुटला की घटाकाश आणि आकाश एकच होऊन जाते. तसेच देह नाश पावला की ही प्राणशक्ती मूळ प्राणब्रह्मात एकरूप होऊन जाते.

श्रीमद्‌ भगवद्‌गीतेत हाच सिध्दांत याच शक्तीबद्दल वेगळ्या शब्दात सांगितला आहे, “नैनम्‌ छिन्दन्ति शस्त्राणि, नैनम्‌ दहति पावक:।”

प्रत्येक घराला दार असतं. दाराला कडी असते आणि आपण घरातून बाहेर जाताना या कडील कुलूप लावतो यात घराचे संरक्षण चोरांपासून करण्यासाठी आपण कुलूप लावतो. १००० स्क्वेअरफूट घराचं संरक्षण काही सें.मी.चं कुलूप जसं करतं त्याचप्रमाणे शरीराला निरामय ठेवून कार्यप्रवण करण्याचे कार्य ही प्राणशक्ती करत असते. ज्यावेळी या प्राणशक्तीला वाहताना किंवा शरीराच्या विवक्षित भागाला ही प्राणशक्ती घेऊन जाणाऱ्या मेरिडीअन्समध्ये अडथळा तयार होतो तेव्हा जणू घराचे कुलूप तुटल्याप्रमाणे शरीराच्या या विशिष्ट भागाची प्रतिकारशक्ती कोलमडून पडते. हा सिध्दांत आहे. शक्तीचा ऱ्हास, शक्तीचा अभाव, शक्तीचा कमी पुरवठा या सगळ्यांचा संबंध त्या विशिष्ट अवयवास आजारमय गोष्टीत परावर्तित होत असतो. प्राणशक्ती नाही म्हणजे संरक्षण नाही आणि संरक्षण नाही म्हणून बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस यांच्या वाढीला अनुकूलता मिळते. दाह, वेदना, ज्वर, पुरळ, अतिसार, वांती या मार्गाने आजार द्रुग्गोचर होतो. प्राणशक्तीचा अभाव हे आजाराचे मूळ कारण आहे आणि प्राणशक्तीच्या अभावाने पेशींमध्ये, ऊतीमध्ये, अवयवांमध्ये आणि प्रणालीमध्ये दोष निर्माण होतात. हे दोष दूर करण्यासाठी प्राणशक्तीचे संतुलन अ‍ॅक्युपंक्चरद्वारे करणे हा उपचाराचा भाग आहे. हा कार्यकारण भाव एकदा लक्षात घेतला म्हणजे आजार, उपचार आणि उपचारपध्दतीत सिध्दांत स्पष्ट होतो.

उपचाराची पध्दत

रुग्णांची पूर्ण केस हिस्टरी व नाडीपरीक्षा केल्यानंतर योग्य निदान झाले की साधारणपणे कुठल्याही जुनाट आजारासाठी पहिल्या पंधरा दिवसांचा कोर्स दिला जातो. त्यासाठी रुग्णाला रोज २० मिनीटांचे एक सिटींग घ्यावे लागते. यासाठी आजारानुसार शरीरावर फक्त १०-१५ अ‍ॅक्युपंक्चर बिंदू घ्यावे लागतात आणि अत्यंत नाजूक अशा केसांइतक्या बारीक सुईने पंक्चर केले जाते. यात कुठलीही वेदना किंवा त्रास रुग्णांना होत नाही. वय वर्षे ४ ते ८० मध्ये कुणीही ही ट्रिटमेंट सहजपणे घेऊ शकतो.

१५ सिटींग्ज नंतर १५ दिवस कुठलीही ट्रीटमेंट दिली जात नाही. फॉलोअपसाठी रुग्णांना १५ दिवसांनी बोलविले जाते. याला ट्रीटमेंटचा एक कोर्स म्हणतात. कुठल्याही जुनाट आजारात जवळ जवळ ७०% रुग्णांना पहिल्याच कोर्समध्ये ८०% ते ९०% फरक पडतो. ३०% रुग्णांना त्यांच्या आजाराच्या स्वरूपानुसार, काळानुसार, प्रकृतीनुसार दुसरा १५ दिवसांचा कोर्स घ्यावा लागतो. किंवा दुर्मीळ वेळा तिसरा कोर्स घ्यावा लागतो. पण यापेक्षा जास्त दिवस ही ट्रीटमेंट दिली जात नाही. ती पुरेशी असते.

२४ तासातून एकदाच हे सिटींग द्यायचे असते. सिटींग्ज लवकर संपावेत म्हणून दिवसातून दोनदा अथवा तीनदा ही ट्रीटमेंट देता येत नाही.

नाडीपरीक्षा आणि अ‍ॅक्युपंक्चर

नाडीपरीक्षा हे रोगाचं अचूक निदान करण्यासाठीचं प्राचीन काळापासून चालत आलेलं महत्त्वाचं साधन आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे आता त्यासाठी तांत्रिक साधनं उपलब्ध आहेत. त्याचा वापर वाढला आणि नाडीपरीक्षेचा वापर कमी झाला आहे. ऊर्जा ही मोजता येत नाही किंवा दिसत नाही. मनगटाशी त्याची स्पंदनं फक्त जाणवतात. निदानाचा अचूकपणा हा उपचारकाच्या स्पंदनाचा योग्य अर्थ लावण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. नाडीपरीक्षेचं तंत्र उत्तमरीत्या अवगत असेल तर अ‍ॅक्युपंक्चरिस्ट रुग्णाला भूतकाळातील आरोग्याची झालेली हानी तसेच येऊ घातलेल्या आजाराची सूचना देऊ शकतो. नाडी ही धोक्यची सूचना देते कारण शारीरिक, मानसिक, भावनिक घडामोडींचा नाडीवर ताबडतोब परिणाम होतो आणि आजाराची लक्षणं दिसायला लागण्याच्याही आधी आजाराची सूचना मिळते. रुग्ण त्याला होणाऱ्या त्रासाचं वर्णन करत असतो तेव्हा त्यामागच्या असंतुलनाचा अंदाज येतो आणि नाडीपरीक्षेवरून त्याला पुरावा मिळतो, खात्री पटते.

अ‍ॅक्युपंक्चरचं तंत्र हे पूर्वीपेक्षा खूप विकसित झालं आहे. पण अजूनही खूप काही होण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोक किंवा प्रशिक्षित उच्चश्रेणीय लोक ह्या अभूतपूर्व क्षेत्राकडे अभावानेच वळताना दिसतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Your Comment:

Related Posts

Finance Services

Recognition Of Acupuncture World Wide – WHO

Over 2500 years of practice of acupuncture and efficacy had resulted in a wealth of technical know-how that lead to a wide range of diseases and conditions that could be effectively treated with this approach. Unlike many other traditional methods of treatment, which tend to be specific to their national or cultural context, acupuncture has been used […]

Finance Services

Scientific Evidence For Acupuncture

Scientific Endorsement The scientific study of Acupuncture began in the ’70s. Acupuncture has become popular world over. Acupuncture is a conquering position as an efficient and safe therapeutic method. The amount of cumulated scientific evidence is already enough to guarantee a highly detached status for acupuncture among other complementary therapies. In many countries, acupuncture is well integrated[…]